सुरुवात
सोसायटी सुरू करण्यामागचे कारण:
भाई दाजीबा देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेचे एस. वाय. पाटील सर हे सचिव होते. बेळगाव आणि आसपासच्या परिसरातील मराठी भाषिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ज्योती महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. मराठी माणसांनी मराठी माणसांसाठी स्थापन केलेली ही संस्था होती म्हणून कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली आणि अनेक अडथळे निर्माण केले. अशा परिस्थितीत कॉलेज चालवणं खूप अवघड होतं. त्याचबरोबर ग्रामीण भागात मंडळातर्फे अनेक माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या. कॉलेज आणि शाळांमधील शिक्षक तुटपुंज्या पगारावर काम करत असत, काही वेळा नियमि पगाराशिवाय राहत असत. राष्ट्रीयीकृत बँका आणि इतर स्थानिक वित्तीय संस्था अशा शिक्षकांना किंवा महाविद्यालयीन व्यवस्थापना वित्तपुरवठा करण्यास धजत नसत. आर्थिक सहाय्य आणि पाठिंब्याशिवाय, शाळा आणि महाविद्यालयांना वारंवार त्रास सहन कर लागला आणि त्या बंद कराव्या लागतात कि काय अशी स्थिती होत होती. या वागणुकीमुळे प्राचार्य एस. वाय. पाटील सरांनी सह सहकारी संस्था सुरू करण्याचा विचार केला. 300 प्राथमिक भागधारकांसह आणि रु. 4 लाखच्या सुरुवातीच्या भागभांडवलाच्या म सोसायटीची स्थापना आणि नोंदणी झाली.बहुतांश भागधारकांमध्ये दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्य आणि शाळांचे शिक्षक, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय आणि मंडळाचे हितचिंतक यांचा समावेश होता.